One cannot be humble and aware of oneself at the same time.
- Madeleine L'Engle, A Circle of Quiet
Receive regular push notifications on your device about new Articles/Stories from QuoteUnquote.
समुद्रा सारखा अथांग, जणू सोसाट्याचा वारा,
रंगवलेल्या संभाजी प्रमाणेच, ह्याचा वकुब सारा.
बेदरकार, बेफिकीर, बेलगाम जणू, स्वतः रंगवलेला लाल्या,
'उसमे क्या है?' म्हणत, हा वाल्मीकिचा करेल वाल्या..
बाई, बाटली, विडी-काडी असे, होते सारे आत्मघातकी नाद,
पण एकदा अभिनयाला मंचावर आला, की मिळे कडsssड्ड्क अशी एकच दाद.
स्वहस्ते स्वतःचा नाश ओढवण्यात, सोडली नाही त्याने कुठलीच कसर,
पण मराठी रंगभूमीचा एकमेव सुपरस्टार, म्हणून होईल एकाच नामाचा गजर..
तो चेहऱ्यावरचा स्पॉटलाईट, तो टाळ्यांचा कडकडाट,
तो चंदेरी दुनियेचा, चमचमता लखलखाट.
ते चाहत्यांचं जीव ओवाळून टाकणं, ती प्रसिद्धीची जहरी नशा,
ना चांगला पुत्र, ना चांगला पती, पण एकमेवाद्वितीय लोकप्रियता लाभलेला हा काश्या..
धरतीवर धाडतो विधाता, अश्या काही व्यक्ती,
ज्यांना ठराविक कार्याव्यतिरिक्त, काहीच करायची नसते सक्ती.
तो म्हणतो ज्याच्या साठी जन्म दिला, बस तेच कर,
कोणी मायकल जॅक्सन, कोणी मॅडोना, कोणी शेन वॉर्न कोणी बनतं आणि डॉ. काशीनाथ घाणेकर......

Quotes By Jhansi ki Rani
10 Bengali Novels Everybody Must Read
5 Interesting Facts About Vietnamese Culture
Quotes By Madan Mohan Malaviya
Unakoti - The Mythical Legend of the Shaivite Statues
Quotes By Mughal Badshahs
Folk Music from Uttar Pradesh.
India's UNESCO World Heritage Caves: Ajanta & Ellora
More from
© 2017 QuoteUnquote All Right Reserved